

Vasudev Miniature
Original price was: ₹580.00.₹550.00Current price is: ₹550.00.
Terracotta miniature Vasudev
Material : Terracotta, cloth
Size : 8 inch x 4 inch x 3 inch
टेराकोट्टा छोटी मूर्ती वासुदेव !
Size: 8 इंच उंच. ४ इंच एकूण रुंदी. ३ इंच खोली .
Material : टेराकोट्टा , कापडी पोषाख
पहाटेच्या वेळी रामकृष्णांचा नामघोष करीत अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पोषाखात येणारे वासुदेव! घोळदार अंगारखा, सुरवार, गळ्यात तांबडा शेला आणि डोक्यावर शंकुच्या आकाराची मोरपिसांची टोपी. कमरेला बांधलेल्या शेल्यात बासरी खोचलेली असते. पायात घंगुरू असतात, हातात चिपळ्या आणि टाळ असतो. त्यांच्या तालावर तो सुंदर धार्मिक गाणी म्हणतो आणि तालावर नाचतो. गृहिणी त्याला धान्य देतात तर कुणी धन. हे दानही वासुदेव विशिष्ट पद्धतीने स्वीकारतो. ‘दान पावलं दान पावलं’ असे म्हणून पोचते करतो. वासुदेवाना दान करणे हा धर्मचरणाचा भाग मानला जातो. वासुदेवांच्या गाण्यात कृष्णचरित्र, भक्तीची थोरवी, प्रपंचनीती असे विषय येतात.
वासुदेवाचे हेच रूप मातीच्या मूर्तीत साकारण्याचा प्रयत्न आमच्या श्रीकांत दादांनी केला आहे. त्यावर कापडी पोषाख चढवला आहे. अतिशय आत्मियतेने तयार केलेली ही मूर्ती आपली संस्कृती बीज रुपात जपण्याचा प्रयत्न आहे.




